Home Breaking News सोशल मीडियातील भाईगिरी भोवली; दगडी येथील बाप-लेकाच्या विरूध्द गुन्हा दाखल व अटक

सोशल मीडियातील भाईगिरी भोवली; दगडी येथील बाप-लेकाच्या विरूध्द गुन्हा दाखल व अटक

1265

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

व्हाटसअप स्टेटसवर शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरीची हौस बाप व त्याच्या मुलाच्या अंगलट आली असून त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल तालुक्यातील दगडी येथील हिरामण मोतीराम मोरे (वय ५७) आणि त्यांचा मुलगा अशोक हिरामण मोरे (वय २६) यांनी व्हाटसअपच्या स्टेटससाठी शॉर्ट व्हिडीओ तयार केला. यात हिरामण मोरे यांच्या हातात देशी बंदूक तर त्यांच्या मुलाच्या हातामध्ये तलवार दिसून येत आहे. याला एडिट करून आपल्या कथित शत्रूंना यातून अशोक मोरे याने धमकावले आहे. दगडी गावासह परिसरात सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन यावल पोलीस स्थानकाच्या पथकाने आज दगडी गाव गाठून हिरामण मोतीराम मोरे आणि त्याचा मुलगा अशोक हिरामण मोरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बंदूक आणि तलवार देखील जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विरूध्द भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच चर्चा सुरू असून या बाप-बेट्याला सोशल मीडियातील भाईगिरी भोवल्याचे मानले जात आहे. या संदर्भात यावल पोलीसात आर्मएक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन,
या गुन्ह्याची कारवाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस अमलदार संजय लक्ष्मण देवरे, कॉन्स्टेबल निलेश वाघ व चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने केली. सदरच्या बाप लेकांने केलेल्या सोशल मिडीयावरील भाईगिरीची प्रसारच्या गोंधळाची यावल तालुक्यात सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे .

Previous articleअखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्रच्या वतीने आज ३० आगस्ट २०२१पुणे येथील आयुक्त कार्यालयावर २०२०च्या पिक विमा मागणी करिता आंदोलन…..
Next articleमहाराष्ट्रातील संपुर्ण मंदिर प्रार्थना स्थळे खुली करा, भारतीय जनता पक्षाची मागणी……