हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी
आज दिनांक ३०आगस्ट २०२१ला धनसावंगी भारतीय जनता पार्टीचे वतीने बबनराव लोणीकर यांचे नेतृत्वाखाली राहुल भैय्या लोणीकर यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आघाडी सरकारने बंद ठेवलेली मंदीरे तात्काळ उघडावे या मागणीसाठी नृसिंह मंदिर घनसावंगी येथे घंटानाद आंदोलन करुन नायब तहसीलदार संदिप मोरे मंडळ अधिकारी सावळे व माळी पोलीस स्टेशन घनसावंगी पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी सर्जेराव जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंकुशराव बोबडे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुभाष देडंगे भारतीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सुरेश उगले, सुरेश पोटे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष.योगेश ढोणे भाजपा तालुका उपाध्यक्ष अर्जुन माळोदे , एकनाथ महाराज राठोड संतोष सोसे, अमोल काळे, जयराम मिसाळ,किरण गुढेकर, राम भालेराव दिगांबर धांडे, संदिप काळें आप्पासाहेब धांडे बाबासाहेब ढवणे अर्जुन शेळके बाजीराव उगले बळीराम गावंडे इत्यादि कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते गेले दिड वर्षांपासून कोविड १९आजाराच्या राज्य सरकारच्या नियमांचे काटेकोर पालन केले महाराष्ट्रातील जनतेने व वारकरी संप्रदाय सर्व मंडळीने केले ज्यामध्ये आम्हच्या आषाढी एकादशी वारी सारख्या भव्यदिव्य सोहळा सुध्दा थाबंवलेला आहे तरीही आम्ही वारकरी बांधवांनी सहकार्य केले आता आपण राज्या मध्ये सर्व काही खुले केले असताना
परंतु वारकरी संप्रदाय व भाविक भक्तांसाठी मंदिरे खुली केले नाही सरकारने बियर बार परमिट रुम हाॅटेल भाजी मंडी माॅल बाजारपेठा चालु केल्या गर्दीचे सर्व ठिकाणे चालु केले परंतु आजपर्यंत पण मंदिरे बंद आहे महाराष्ट्र तील धार्मिक स्थळे व मंदिरे खुली करा नाहीतर महाराष्ट्र भर तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.