27 ऑगस्ट रोजी रात्री च्या दरम्यान दाभा गावाजवळील बंधार्यावरून बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट व दिनांक 30 ऑगस्ट पहाटे कुणावार कॉलनी शेवाळकर लेआऊट हिंगणघाट येथून सेंट्रींग प्लेट चोरी गेल्या बाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे 1) अ.क्र 758 /2021 कलम 379 भादवी
2 )अ.क्रम759 /2021 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल केला.
सदर माहितीची पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो. हवा. शेखर डोंगरे यांचे डीबी पथकाला पो.नि. संपत चव्हाण यांनी माहिती देऊन रवाना केले सदरची माहिती मिळताच लगेच पोलीस हवालदार शेखर डोंगरे यांचे पथक हिंगणघाट परिसरात रवाना होऊन आरोपी व चोरीच्या मालाचा शोध घेत असतात त्यांच्या पथकांनी आपल्या नेटवर्क चा फायदा घेत सदर गुन्ह्यातील आरोपी 1) निलेश शंकरराव कुरील वय 29 वर्ष
2) नदीम नियाज मल्लस वय 30 वर्ष 3)गणेश बापूराव गुंजेकार वय 33 वर्ष
सर्व राहणार हिंगणघाट यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करून त्यांच्याकडून 2 गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 106000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यात आरोपीवर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे यापूर्वी गुन्हे दाखल असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सदरची कामगिरी मा.श्री प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा मा.श्री यशवंत सोळंके अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा मा.श्री दिनेश कदम उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट ,पोलीस निरीक्षक श्री संपत चव्हाण पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा शेखर डोंगरे, नापोशी निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, समीर कामडी ,भूषण भोयर सचिन भारशंकर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा