Home अमरावती तळागाळातील लोककलावंताच्या समस्या शासनदरबारी पोहचवून कलावंताना न्याय मिळवून देण्यास बांधील रहाणार !...

तळागाळातील लोककलावंताच्या समस्या शासनदरबारी पोहचवून कलावंताना न्याय मिळवून देण्यास बांधील रहाणार ! – अॅड किरणराव सरनाईक .

236

 

” तळागाळातील लोककलावंताच्या समस्या शासन दरबारी पोहचवून कलावंताना न्याय मिळवून देण्यास बांधील रहाणार ! ” असे स्पष्ट व परखड आश्वासन लोककलावंत मेळाव्यात आपल्या उद्घाटनपर संभाषणातून बोलतांना, अमरावती विभागीय शिक्षक आमदार, अॅड . किरणराव सरनाईक यांनी दिले . . . . याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दि.01 सप्टेंबर रोजी, स्थानिक श्री कामाक्षा माता मंदिर सभागृह, कारंजा . येथे अखिल भारतिय मराठी नाटय परिषद नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य : नंदकिशोर कव्हळकर, कार्यक्रमाचे उदघाटक : अमरावती शिक्षक मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अॅड . किरणराव सरनाईक, मार्गदर्शक : संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष : हभप . श्रीकृष्ण महाराज राऊत, तरुण क्रांती मंच वाशिम जिल्हाध्यक्ष : पत्रकार निलेश सोमाणी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, गणेशराव बाबरे, जि प समाज कल्याण माजी सभापती, जयकिसनभाऊ राठोड, माजी नगराध्यक्ष : दत्तराजजी डहाके, अखिल भारतिय नाटय परिषद शाखा कारंजाच्या अध्यक्षा : सौ सुधाताई चवरे, स्वागताध्यक्ष : विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष : संजय कडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा साप्ताहिक करंजमहात्म्यच्या वतीने . भजनी लोककलावंताचा भव्य मेळावा घेण्यात आला . यावेळी सर्वप्रथम, कारंजेकरांची आद्यशक्ती श्री कामक्षा मातेचे पूजन शिक्षक आमदार अॅड .किरणराव सरनाईक यांनी केले तसेच क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उद्‌घाटन केले . त्यानंतर कार्यक्रमाचे उद्‌घाटक नव निर्वाचित शिक्षक आमदार अॅड . किरणराव सरनाईक यांचे कारंजा येथे प्रथम आगमनानिमित्त त्यांना कारंजेकरांचे आराध्य दैवत श्री नृसिह सरस्वती स्वामी ची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला . याप्रसंगी पंचक्रोशीतील भजनी मंडळानी व लोककलावंतानी सहभाग घेतला . यावेळी वडगाव इजारा येथील बंजारा महिला मंडळ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले . कार्यक्रमाचे आयोजन व संचालन स्वागताध्यक्ष संजय कडोळे यांनी केले . कार्यक्रमाला पांडूरंगजी माने, मोहित जोहरापूरकर, ओंकार मलवळकर ,विजय पाटील खंडार, डॉ . कुंदन श्यामसुंदर, देविदास नांदेकर, ज्ञानेश्वर खंडारे, रोहित महाजन, उमेश अनासाने, हिम्मत मोहकर, सुनिल गुंठेवार यांचे सहकार्य लाभले . संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात लोककलावंतानी आपल्या विविध लोककला सादर केल्या .समारोपाचा कार्यक्रम संत नागाबाबा संस्थान मनभा चे अध्यक्ष : व्यंकटराव कावरे यांचे अध्यक्षतेखाली भजनीमंडळी व लोककलावंताना सन्मानपत्र देऊन करण्यात आला .आभार प्रदर्शन उदय कव्हळकर, सूरज कव्हळकर यांनी केले .

Previous articleट्रॅक्टर टॉली चोरणारे आरोपी गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस यांचे ताब्यात
Next articleबोरगाव धांदे गाव हादरले”, एकाच दिवशी दोन माणसांचा संशयास्पद मृत्यू