Home Breaking News हिंगणघाट शहराची भाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित..

हिंगणघाट शहराची भाजयुमोची नवी कार्यकारिणी घोषित..

439

हिंगणघाट दि.२ सप्टेंबर
आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितित भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे निर्देशानुसार शहर कार्यकारीणी घोषित करण्यात आली.
कार्यकारिणीचे घोषणेनंतर आमदार समिर कुणावार यांनी भाजयुमो शहर नवनियुक्त अध्यक्ष सोनु पांडे तसेच सर्व नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करीत त्यांना लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री अविनाशजी देव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरूणजी पाठक ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नितीन मडावी, हिंगणघाट ग्रामीण तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे ,महिला भाजपा शहराध्यक्ष सौ. अनिता ताई माळवे, समाजसेवक सुनील डोंगरे, नगर परिषदेचे स्वास्थ सभापती सोनू गवळी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन सुभाषजी कुंटेवार यांनी केले तर भाजपा शहराध्यक्ष आशिष परबत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
स्थानिक आमदार जनसंपर्क कार्यालयात कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी
सोनू पांडे (शहराध्यक्ष), गौरव तांबोळी (संघटन महामंत्री), स्वप्निल शर्मा (महामंत्री), अतुल नंदागवळी (महामंत्री), योगेश्वर जिकार (सोशल मिडीया प्रमुख), भुषन आष्टनकर (उपाध्यक्ष), मुकेश गुजराती (उपाध्यक्ष),
तुषार हवाईकर (उपाध्यक्ष), नितीन नांदे (उपाध्यक्ष), रितिक दांडेकर (सचिव),
निखील हिवंज (सचिव), अक्षय हारगोडे (सचिव), नीरज सैनी (सचिव), बाबू चौहान (सचिव), सुरज युवनाथे (संपर्क प्रमुख),
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleबोरगाव धांदे गाव हादरले”, एकाच दिवशी दोन माणसांचा संशयास्पद मृत्यू
Next articleधावत्या टिप्परमधुन पडल्याने क्लीनर गंभीर जखमी झाल्याची घटना