Home वर्धा एस एस एम विद्यालयात शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न    

एस एस एम विद्यालयात शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न    

268

प्रोग्रेसिव एजुकेशन सोसायटी हिंगणघाट द्वारा संचालित एस. एस. एम.विद्यालय, हिंगणघाट येथे शिक्षक दिन व सत्कार समारंभ कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्र. ल.देशपांडे पर्यवेक्षक श्री भ.तु. धोंगडे सकाळ पाळी प्रमुख श्री रा.ता.कारवटकर पालक श्री भास्करराव नवघरे  प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन माता सरस्वती  व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदनेने झाली श्री गावंडे व श्री झाडे यांनी स्वागत गीत व वैयक्तिक गीत सादर केले  यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांच्या हस्ते  शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या कु. मोहिनी नवघरे या विद्यार्थिनीचा सत्कार संस्थेच्या वतीने मेडल देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री देशपांडे यांनी केले त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.श्री भास्करराव नवघरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे असते असे सांगितले.
यावेळी मार्गदर्शक शिक्षिका सौ हिंगमीरे यांनी गुरू शिष्य परंपरेचे महत्व सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्य श्री संजयराव देशपांडे यांनी देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकाच्या सन्मानाचा दिवस हा शिक्षक दिन आहे. तसेच शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारा दिवस आहे भारतात प्राचीन काळापासून गुरू शिष्य परंपरेला महत्त्व आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ नंदनवार यांनी व आभार पर्यवेक्षक श्री धोंगडे यांनी मानले कार्यक्रमाचा शेवट एकात्मता मंत्राने झाला.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleकोरोणाच्या संकटात आता साथीच्या रोगाचं थैमान यवतमाळ मध्यें डेंग्यू मलेरियाचे थैमान रुग्णांची संख्यात वाढ
Next articleसाने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक व पत्रकारांना केले सन्मानित