Home Breaking News प्राणघातक शस्त्राने जखमी केल्याबद्दल प्रेमाचा चहा संचालक संतोष ठाकूर ,विकी ठाकूर पितापुत्र...

प्राणघातक शस्त्राने जखमी केल्याबद्दल प्रेमाचा चहा संचालक संतोष ठाकूर ,विकी ठाकूर पितापुत्र सहित अफसर पठाण यास अटक

1167

 

5 सप्टेंबर
हिंगणघाट शहरातील मोहता चौक येथील ‘प्रेमाचा चहा’ येथे एका व्यावसायिकास प्राणघातक शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी 7.30 वाजताचे दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रेमाच्या चहाचे संचालक संतोष गौतम(ठाकुर) पितापुत्रासह अफसर खान पठाण याला अटक करण्यात आली.
फिर्यादिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार संतोष ठाकुर यांचे स्थानिक पंजाब नेशनल बँक परिसरात एक दुकानाचा गाळा आहे,तो गाळा फिर्यादि मोटवानी यांना भाडयाने दिला आहे,तेथे मोटवानी यांचे प्रिन्सेस गारमेंट नावाने रेडीमेड कापड दुकान आहे.
आरोपी संतोष ठाकुर यांनी हा गाळा खाली करुन देण्यासाठी मोटवानी बंधु कडे तगादा लावला होता,दुकान रिकामे करुन देण्याचे कारणावरुन फिर्यादि इंद्रजीत प्रल्हाद मोटवाणी यास आरोपीने शिविगाळ केली,याचा जाब विचारण्यासाठी ठाकुर यांचे ‘प्रेमाचा चहा’ येथे गेलेल्या फिर्यादि इंद्रजीत मोटवानी व त्याचे मित्रांवर संतोष ठाकुर,मुलगा विकी ठाकुर,अफ़सर पठाण इत्यादिनी प्राणघातक शस्त्राने जखमी करीत हल्ला चढविला.
सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी आरोपी विक्रम ठाकुर,संतोष ठाकुर व त्यांचा एक साथीदार अफसरखान पठाण यास ताब्यात घेतले असून कलम 307,294,34 भादंवीनुसार गुन्हा नोंद केला.
सदर प्रकरणी संतोष ठाकुर यानी सुद्धा पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी एक तर्फी कारवाई केल्याचा आरोप संतोष ठाकुर यांनी केला आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleसाने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा, शिक्षक व पत्रकारांना केले सन्मानित
Next articleराज्यातील अपंगांनी कल्याण अपंग आयुक्त पुणे येथे घेराव आंदोलनमध्ये सहभागी व्हा…..जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम