Home Breaking News प्रेमाच्या चहा’ मधे जखमी झालेल्या मोटवाणी व साथीदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

प्रेमाच्या चहा’ मधे जखमी झालेल्या मोटवाणी व साथीदारांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

562

 

हिंगणघाट ,दि.६
शहरातील मोहता चौक येथील ‘प्रेमाचा चहा’ येथे एका व्यावसायिकास प्राणघातक शस्त्राने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना दि.४ रोजी घडली असून त्याच दिवशी पहाटे आरोपिंना पोलिसांनी अटक केली असून ठाकुर पितापुत्रांना हिंगणघाट न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
या दरम्यान संतोष ठाकुर यांचे तक्रारीवरुन पोलिसांनी जखमी झालेल्या इंद्रजीत मोटवानीसह मनोहर बलवानी,सुमित आहुजा,पप्पू मोटवानी,देवू मोटवानी,जीतू मोटवानी यांचेवरही आता गुन्हा नोंद करीत कारवाई केली आहे.
संतोष ठाकुर यांचे स्थानिक पंजाब नेशनल बँक परिसरात एक दुकानाचा गाळा आहे,तो गाळा मोटवानी यांना भाडयाने दिला आहे, आरोपी संतोष ठाकुर यांनी हा गाळा खाली करुन देण्यासाठी मोटवानी बंधुकडे तगादा लावला होता,दुकान रिकामे करुन देण्याचे कारणावरुन मोटवाणी परिवाराचे सदस्यांना यास संतोष ठाकुर याने शिविगाळ केली,याचा जाब विचारण्यासाठी ठाकुर यांचे ‘प्रेमाचा चहा’ येथे गेलेल्या इंद्रजीत मोटवानी व सहकाऱ्यावर ठाकुर पितापुत्रानी प्राणघातक हत्याराने हल्ला चढविला.
सदर घटनेची तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी आरोपी विक्रम ठाकुर,संतोष ठाकुर व त्यांचा एक साथीदार अफसरखान पठान यास अटक केली असून कलम ३०७,२९४,३४ भादंवीनुसार गुन्हा नोंद केला.सदर प्रकरणी ठाकुर कंपनीच्या सदस्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे,
संतोष ठाकुर यानेसुद्धा मोटवानी व साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती, पोलिसांनी मात्र सदर तक्रार प्रलंबीत ठेवली होती,परंतु आता पोलिसांनी इंद्रजीत मोटवानी यांचेसह इतर ५ जनांवरती भादंवीच्या कलमांन्वये १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,४५२,२९४,५०६ गुन्हा दाखल करण्यात आला.
सूर्य मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleलवळे ग्रामपंचायतीच्या वतीने विदयार्थ्यांचा सत्करा समारंभ…. सरपंच निलेश भाऊ गावडे
Next articleराष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर जाम ते नागपुर जाणा-या रस्त्यावर उभ्या असलेल्या स्कॉर्पियोवर प्लेझर वाहनाने धडक