Home Breaking News मनवेल दगडी दरम्यान भिषण अपघात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

मनवेल दगडी दरम्यान भिषण अपघात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

1076

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी ते मनवेल रस्त्यावर भरधाव प्रवाशी रिक्षाची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. रिक्षाचालक रिक्षा सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील साकळी येथील रहिवाशी भास्कर उखा भील (वय-६२) हे आपल्या दुचाकीने आज मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामावरून साकळी येथे जात होते. दरम्यान साकळी ते मनवले रस्त्याने जात असतांना समोरून भरधाव रिक्षा (एमएच १९ एजे ०१९४) ने दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातात भास्कर उखा भिल वय६२ वर्ष यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला. अपघात होताच सदर रिक्षा चालक रिक्षा सोडून घटनास्थळावरून पसार झला आहे. याप्रकरणी मयताचा मुलगा ताथु भास्कर भिल याच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीसांकडुन अपघातास कारणीभुत रिक्षा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक पाटील यांच्या आदेशावरून पोलीस उप निरिक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाच पोळे हे करीत आहे. दरम्यान मयत भास्कर उखा भिल यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे .

Previous articleदुचाकिच्या धडकेत सायकल स्वार तरुणांचा जरुड ( इसंब्री ) मार्गावरील घटणा
Next articleशहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील स्नेहल किसान नर्सरी समोर दुचाकी अनियंत्रित होऊन 1 जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी