Home Breaking News शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील स्नेहल किसान नर्सरी समोर दुचाकी अनियंत्रित...

शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील स्नेहल किसान नर्सरी समोर दुचाकी अनियंत्रित होऊन 1 जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी

330

 

 

हिंगणघाट शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर 4 वाजताच्या दरम्यान स्नेहल किसान नर्सरी समोर सिबीझेड दुचाकी क्रमांक एम एस 40 ए.ए 8214 ने 3 व्यक्ती भरधाव वेगाने जात असताना अचानक त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या या भिषण अपघातात 1 जागीच मृत्यू तर 2 गंभीर जखमी झाले आहे. माहिती वरून हे 3 व्यक्ती गिमा टेक्सटाइल येथिल कामगार असल्याचे समजते. या अपघातात घटनास्थळी मुत्यू व्यक्तीचे रसत्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जबर डोक आदळल्याने भेजा बाहेर निघून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संपतजी चव्हान, पोलीस उपनिरीक्षक गिरधर पेंदुर,,दिपेश ठाकरे, अमोल लगड, वाहतूक पोलीस अझर खान, प्रदिप राठोड, पोलिस कर्मचारी नितीन राजपूत,दिपक मसके,अनिल केकपुरे, पवार, यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अद्याप तरी मुत्यक व जखमी व्यक्तीची ओळख पटली नसुन पोलिसांकडून नावे शोधण्याचे काम सुरू आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleमनवेल दगडी दरम्यान भिषण अपघात भरधाव रिक्षाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार
Next articleसांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न