Home Breaking News पत्रकारावर ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप करणारा ए. एस. के रेस्टॉरंट संचालक रवी कांबळे...

पत्रकारावर ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप करणारा ए. एस. के रेस्टॉरंट संचालक रवी कांबळे यांनी विष प्राशन केले

443

 

दि.८ ऑगस्ट
राष्ट्रीय महामार्गावरील उबदा येथील एका हाॅटेल व्यवसायीकाला अवैद्य धंन्दे करीत असल्याची धमकी देऊन पैश्याची मागणी केल्याप्रकरणी समुद्रपुर पोलिसात तक्रार दाखल केल्या नंतर यातील आरोप करणारा हाॅटेल संचालक रवि कांबळे याने शहरातील विरभगतसिंग वार्ड येथील निवासस्थानी विष प्राशन केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
आज दि.८ रोजी रवी कांबळे याने विष प्राशन केल्यानंतर त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये सदर वृत्त प्रसारीत झाल्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे
या हाॅटेल व्यावसायीकाने पत्रकारांनी ब्लकमेल करीत असल्याचा आरोप लावित समुद्रपुर पोलिसात दोन पत्रकारांविरोधात तक्रार दाखल केली.
यानंतर वर्धा येथील एका नांमवत दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधीने सुध्दा वर्धा पोलिसात खोटी तक्रार देऊन मला फसविण्याचा प्रयत्न असल्याचे निवेदन दिले.
उबदा येथील ए एस के रेस्टोरेंट हे येथील व्यवसायीक अनिकेत कांबळे यांच्या कुटूबियांच्या नावावरती असुन ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत , हाॅटेल संचालक रवि कांबळे यांनी आज हिंगणघाट येथील निवासस्थानी विष प्राशन केल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे

Previous articleसांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न
Next articleदुःखद बातमि स्वाभिमानीचे राणा चंदन कालवश