आमदार कुणावार यांनी केले शासकीय निर्बंध पाळण्याचे आवाहन
हिंगणघाट दि.९ ऑगस्ट
येत्या गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमिवर आज दि.९ रोजी
स्थानिक उपविभागीय कार्यालय सभागृहात शांतता समितीची सभा संपन्न झाली.यावेळी आमदार समीर कुणावार यांनी तालुक्यात कोरोना तसेच डेंगु,मलेरियासारख्या साथीचा रोगांचा फैलाव झाला असल्याने नागरीकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तसेच पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी गणेशोत्सव व तत्सम सणासुदीचे काळात शासकीय निर्बंध असल्याने ते पाळण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले,कोरोनाची तीसरी लाट येऊ पहात आहे,तीला रोखण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता आभासी माध्यामातुन दर्शन व कार्यक्रम घेण्याचे आवाहन बैठकीचेवेळी करण्यात आले,भाविकांनी मास्क, सैनीटायजरचा वापर करीत सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सुचना जनतेला देण्यात आल्या.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले या होत्या.यावेळी तहसीलदार श्रीराम मुंदड़ा,ठाणेदार संपत चव्हाण इत्यादि अधिकाऱ्यांसह शहरातील राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्यावेळी नायब तहसीलदार पठाण,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिस्मिल्लाह खान,वणा संवर्धन समितीचे रूपेश लाजुरकर,नगरसेवक प्रकाश राऊत,माजी नगरसेवक अशोक रामटेके,सुनील डोंगरे,आशिष भोयर,गौरव तिमांडे,सामाजिक कार्यकर्ता तुषार हवाईकर,शंकर मुंजेवार, ज्वलंत मुन, समाज सेवक दिनेश कुमार वर्मा. इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा