नंदोरी चौक, अत्यंत दळणवळण आणि गर्दीचा चौक म्हणुन याची ओळख आहे.
बर्याच ग्रामिण भागाला जोडणारा रस्ता आणि याच रस्त्यावर येणारे विद्यालय, मंगल कार्यालय , वसतिगृह , बैंक इत्यादि संस्थाने आहेत ,
ह्याच ठिकानी दररोज भाजी मार्केट सुद्धा भरते इतक्या गर्दी च्या चौकाला मागिल काही दिवसांपासून ग्रहण लागल्याचे जाणवते.
गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असल्याने जनता हताश झालेली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द पोलिस बांधवांवर गोळीबार ह्याच चौक मध्ये झाला .
प्राध्यापिकेच जळित हत्याकांड तर संपुर्ण देशानी बघितले ते सुद्धा ह्याच प्रभागात घडले,
प्रभागातील प्रमुख नंदोरी चौक मध्ये दारुड्यांचे प्रमाण आणखी जुगार खेळणारे दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गांजा चि सर्रास विक्री होत असुन चाकु सुरी बाळगणारे सुद्धा वाढले आहेत. यामुळे जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागा मध्ये चोरीचे प्रमाण ही अधिक आहे, चोरट्यांनी श्रावस्ति बुद्ध विहार (प्रज्ञा नगर) फोडून दान पेटी चोरुन नेण्याचं उदाहरण तर ताजं आहे.
सोबतच घरगुती चोरीचे प्रमाण ही अधीक आहे , ह्याच प्रभागात असंख्य मंदिरे आणि विहार आहेत, राष्ट्रीय महामार्ग च्या पलिकडे एक नवीन हिंगणघाट निर्माण होत असुन त्या ठिकाणी शहर पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नंदोरी चौक येथे एक नवीन पोलिस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात मार्फत करण्यात आली,
निवेदन देताना
मनोहर कांबळे,प्रमोद हस्ते,भाऊराव कोटकर,उमेश शंभरकर,विजय राडे,संदेश थुल,साहील कांबळे,प्रज्वल मेंढे,हिमांशू रंगारी,अजीत कांबळे,वृषभ इंदुरकर,चेतन घुसे,अखिल धाबर्डे
इत्यादी उपस्थित होते
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा