हिंगणघाट दि.१६ सेप्टेंबर
नगरपालिकेच्या स्वास्थ विभागाची सेवानिवृत्त महिला कर्मचारी तसेच तिच्या मुलाने वेतनाची रक्कम कमी मिळत असल्याच्या दावा करीत पालिकेच्या लेखाविभाग तसेच आस्थापना विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना काल दि.१५ सेप्टेंबरला घडली असून यावेळी सदर कर्मचारी व मुलगा दारुचे नशेत असल्याचे सांगण्यात येत असून आरोपींवर कारवाई करण्याचे मागणीसाठी आज गुरुवार रोजी
पालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आन्दोलन केले.
सदर प्रकरणी संबंधितावर कारवाई व्हावी,अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी तसेच पालिका प्रशासनाकडे केली.
महिला कर्मचारी त्रिवेणी नक्के व पिंकू मारवे यांनी काल दि.१५ व दि.९ रोजी कर्तव्यावरील कर्मचाऱ्याशी सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम कमी का काढली असे विचारीत कार्यालयातील कर्मचाऱ्यास अश्लील शिविगाळ केली मारहाण करण्याची धमकीही दिली,यावरून संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्यावतीने आज एक दिवसीय कामबंद आंदोलन सुरुवात केले.
महिला कर्मचारी व तीचा मुलगा यांनी दारुच्या नशेत कार्यालयात धुमाकुळ घातला,नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांच्यानावे शिविगाळसुद्धा केली, शासकीय कामात अडथळा निर्माण केला,अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यातही केली.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा