आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले
आज दिनांक 17/9/2020 रोज शुक्रवार दिवशी पोलीस पाटील महाराष्ट्र गांवकामगार संघटना आर्वीच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गावकामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा रमेशजी ढोकणे हे होते, कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते प्रल्हादजी देशभ्रतार यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आर्वी तालुका तहसिलदार मा विद्यासागर चव्हाण सर, आर्वी पोलिस स्टेशनचे ठाणेदार, पोलिस निरीक्षक मा भानुदास पिदुरकर सर, गावकामगार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा परशुरामकर पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले, मंचकावर उपस्थित मधुकरराव सोनकुवर यांनीही याप्रसंगी आपले मत मांडले, कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचे पुजन व दीपप्रज्वलन करुन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण सातपुडके पाटील यांनी केले तर प्रास्ताविक मोहन कांबळे पाटील यांनी केले, आभार प्रदर्शन मंगेश डाखोडे पाटील यांनी केले, कार्यक्रमात कोरोना योध्दा म्हणून कोरोना काळात केलेल्या कामाचा सन्मान म्हणून तहसिलदार चव्हाण साहेबांनी पोलीस स्टेशनला असलेल्या सर्व पोलीस पाटलांचे कौतुक करत सन्मानपत्र दिले, सोबतच गावकामगार पोलिस पाटील संघटनेचे पद नियुक्ती केली यामध्ये मुख्यतः झामरे पाटील यांना जिल्हा उपाध्यक्ष तर कांबळे पाटील यांना आर्वी तालुका अध्यक्ष नियुक्त करण्यात आले,तसेच महिला संघाची निवड करण्यात आली यामध्ये बनकर मॅडम जिल्हा अध्यक्ष तर अमिता धनगर व स्वाती राऊत यांना जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विरुलकर पाटील, खंडारे पाटील, पखाले पाटील सहारे पाटील यांनी व तालुक्यातील संपुर्ण पोलिस पाटलांनी योगदान दिले, कार्यक्रमाला जिल्ह्यातील बरेचसे पदाधिकारी व पाटील उपस्थित होते