Home Breaking News यावल तालुका विधी समितीच्यावतीने वागझिरा गावात मोफत कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

यावल तालुका विधी समितीच्यावतीने वागझिरा गावात मोफत कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न

840

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

आज दिनांक 17/ 9 /20 21 रोजी वार शुक्रवार सकाळी 10 वाजेला यावल तालुका विधी समितीच्या वतीने वाघझिरा गावात मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिरात गावातील नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश एम एच बनचरे यांच्या आदेशानुसार यावल वकील बारअसोसिएशनचे सदस्य तथा विधी सेवा समिती सदस्य ऍड अजय कुलकर्णी अशोक सुरडकर वकील याकूब तडवी वकील ग्रुप ग्रामपंचायत मालोद ग्रामसेवक राजू तडवी , यावल विधी समिती सदस्य या सर्वांनी कार्यक्रमात मार्गदशन केले या प्रसंगी वाघिरा गावाचे माजी सरपंच हसीना तडवी वाघझिरा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी कार्यक्रमाचे अध्यक्ष भार सिंग बारेला वाघिरा आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड अशोक सुरडकर यांनी कायदेविषयक जनजागृती व विधी समिती चे ध्येय उद्दिष्ट व वाहन विषयक कायदा ची संपूर्ण माहिती दिली यानंतर वकील संघाचे सदस्य ऍड अजय कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायदा विषयी संपूर्ण माहिती गावातील नागरिकांना दिली या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवक राजू तडवी यांनी- जन्म नोंद मृत्यू नोंद विवाह दाखले वारस दाखला नोंदी , पेसा कायदा, समाज कल्याण ,शबरी आवास योजना ,ग्रामीण हमी योजना व यांची माहिती सांगत ग्रामपंचायत अधिनियम , लोक अदालत , माहिती अधिकार ,नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य कौटुंबिक हिंसाचार , या विविध विषयांची कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गावातील नागरिकांनी देखील या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद देत आपल्या मनातील शंका विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले वाघझिरा वतीने सर्व सन्माननीय वकील, बांधवांचा ग्रामसेवक, पत्रकार ,सत्कार करण्यात आला तसेच गावात मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याबद्दल प्रथम वर्ग माननीय न्यायाधीश एम एस बनचरे साहेब असोसिएशन व विधी सेवा समिती यावल यांचे देखील आभार मानण्यात आले.

Previous articleआर्वी येथे पोलीस पाटील गाव कामगार संघटनेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन
Next articleभाजपा पोहना सर्कलच्या वतीने आमदार समीर कुणावार यांच्या शुभ हस्ते अपंग तरुणाला एक लाखाची आर्थिक मदत