हिंगणघाट दि.२० सप्टेंबर शहरात मोकाट जनावरांनी धुमाकुळ घातला असून मुख्य मार्गासह प्रत्येक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
स्थानिक नागरीकांनी ओरड केल्यानंतर पालिका प्रशासनाने मोकाट फ़िरणाऱ्या जनावरांना ताब्यात घेण्याची मोहीम आज दि.२० पासून सुरु केली, आज पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर मोकाट फ़िरणाऱ्या गाईवासरांना ताब्यात घेताना आढळले,अचानक या मोकाट जनावरांच्या मालकांना कारवाईबद्दल माहिती मिळताच आपले पशुधन सोडविण्यासाठी धाव घेतली.
आठवड्यापुर्वीच पालिकेने याची जाहिर सुचना लाऊडस्पिकरद्वारे शहरातील सर्व भागात दिली होती,परंतु जनाची नाही तर मनाचीसुद्धा लाज न बाळगणाऱ्या पशुधन मालकांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
परंतु आता कारवाईची चाहुल लागताच घबराट निर्माण झाली आहे.
या मोकाट फिरणाऱ्या गाईवासरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून अनेक नागरिकांना गंभीर अपघातास सामोरे जावे लागते,
अशावेळी या मोकाट जनावरांच्या मालकांवरती जबर दंड आकारावा,अशी नागरिकांची मागणी आहे.
पालिकेच्या पथकाने आज दि.२० रोजी कारवाई केली असली तरी जनावरांच्या कोंडवाड्याला दार अस्तित्वात नसल्याने आज मात्र बंदिस्त कैलेल्या मोकाट जनावरांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळाली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा