Home वर्धा उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॉ.रा.भ.उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांची 92वी जयंती साजरी

उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे डॉ.रा.भ.उपाख्य अण्णासाहेब शेंडे यांची 92वी जयंती साजरी

403

 

आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले

वैद्यकीय अधिक्षक डॉ. मोहनजी सुटे यांनी अण्णासाहेब यांचा फोटोचे हरार्पण व पूजन केले. आणि उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.अण्णासाहेबांचे कार्य सर्वश्रुत आहे. त्यांनी जिवंतपणी समाजाला सामाजिक स्थान मिळवून देण्यात स्वतः चे आयुष्य समर्पित केले. त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,अँड.हरिदास बाबूजी आवळे, बॅरिस्टर खोब्रागडे यांच्याशी जवळचा संबंध आला. वर्धा जिल्ह्यातील सर्व सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी बौद्धविकार म्हणून आपल्या वाणीचे जनतेमध्ये छाप निर्माण केली.
अशा एका सामाजिक योद्धयाचे निर्वाण २अक्टोबर 2010 ला स्वतः चे घरी नांदपूर ता. आर्वी जि. वर्धा येथे झाले.
त्यांच्या जयंतीनिमित्त डॉ.वंदनाताई वावरे, डॉ.निरज कदम,डॉ.आशिष सोनी,डॉ.उज्वल देवकाते,डॉ.हेमंत पाटील,डॉ.नरेंद्र गुप्ता, राहुल शेंडे(समुपदेशक), सोनाली घुरडे,कोमलताई जवादे रुग्णालयातील ईतर कर्मचारी तसेच सुरेशभाऊ भिवगडे, नरेंद्र पखाले (शिक्षक) सारीपुत्र भगत, संजयभाऊ हिरवे, अरुणभाऊ भोगे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleहिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब द्वारा आयोजित राष्ट्रीय फुटबॉल लिग स्पर्धा चे आयोजन व बक्षीस वितरण.
Next articleअलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला