Home बुलढाणा प्रहार संघटनेच्या त्या “कृत्या ‘विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी-भाजपा महिला मोर्चा ची...

प्रहार संघटनेच्या त्या “कृत्या ‘विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी-भाजपा महिला मोर्चा ची मागणी..

270

 

शेगाव: प्रहार संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे कार्यालयासमोर नगराध्यक्ष यांचा प्रतिकात्मक पुतळा साडी नेसवून जाळण्याचा प्रयत्न म्हणजे महिलावर्गाची विटंबना होय या घटनेबद्दल प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याला विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे करण्यात आली आहे. शेगाव शहरात 19 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन करण्यात आले सध्या कोरूना प्रादुर्भाव वाढू नाही करिता नगरपालिकेने भागामध्ये खाजगी वाहनाद्वारे गणपती विसर्जन उभे केले होते या खासगी वाहनांमध्ये ठेवण्यात आलेले पाण्याच्या टाकी ह्या अतिशय घाणीने माखलेले असल्याने अशा घाण युक्त पाण्यामध्ये गणपती विसर्जन करून नगरपालिकेने गणपती मूर्तीचे विटंबना केल्याचा आरोप संघटनेने करून नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शकुंतला बुच यांचा प्रतीकात्मक पुतळा पुतळ्याला साडी नेसून प्रहार संघटनेच्या वतीने शेगाव नगरपालिका कार्यालयासमोर पुतळा जाळण्यात आला या घटनेचे तीव्र पडसाद भारतीय जनता पक्षाच्या वतीने 21 सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली व प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली या प्रमाणे आज 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार शेगाव यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा तर्फे व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन दिले आहे व या निवेदनात म्हटले आहे की अशा प्रकारे साडी नेसून पुतळा जाळण्याचा प्रकार म्हणजे महिलांचा अपमान करणे होय या प्रकरणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते विरुद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा डॉक्टर ज्योती भुतडा, बुलढाणा जिल्हा सरचिटणीस सौ कल्पनाताई मसणे, शेगाव शहर सरचिटणीस सौ.मंजू शर्मा नगरसेविका अलका खांजोडे मॅडम, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे , तालुकाध्यक्ष विजय भालतिलक, माजी शहराध्यक्ष डॉक्टर मोहन बानोले जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय लांजुळकर भाजपा किसान आघाडीचे माजी, अमित जाधव, नगरसेवक पुरुषोत्तमा हाडोळे भाजपाचे माजी नगरसेवक शांताराम बेडेकर, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Previous articleअलमपुर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या.प्रेरणेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म सप्ताह निमित्त ग्राम स्वच्छ ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला
Next articleआर्वी शहर मे उर्स मुबारक