अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनीधी सेनगाव
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुकांसाठी भूमिपुत्र लवकरच पाठिंबा जाहीर करणार असल्याचे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी सांगितले होते या बातमीनंतर मात्र सर्व जिल्ह्याचे लक्ष हे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पाठिंबा कडे लागले होते येत्या २८ सप्टेंबरला रिसोड येथील भूमिपुत्र च्या कार्यालयात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंत भुतेकर साहेब व तसेच राज्याचे प्रवक्ते डॉक्टर जितेंद्र गवळी साहेब आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर जी अवचार यांच्या प्रमुख उपस्थित पाठिंबा जाहीर करणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी केले आहे