शेगांव नगर पालिकेची सत्ता चालवितांना तिथे आपल्याच हातात सत्ता कायम राहील या भ्रमात ही मंडळी वावरत असुन स्वतःच निर्माण केलेल्या खोटारडेपणात अडकुन आता शहर वासियांना सत्यपरिस्थिती दिसत असल्याने निवडणुक समोर असल्याने हे राज्यकर्ते कांगावा करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करुन प्रहारची मुस्कटदाबी करण्याचा केवीलवाना प्रयत्न निंदणीय असुन महीलांच्या नावाने राजकारण करुन या मंडळींनी सलग पाच वर्षे केलेला भ्रष्ट कारभाराला ही मंडळी लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा आता जनतेच्या न्यायालयातच फ ाडु हे न.प. सत्ताधार्यांनी लक्षात ठेवावे. महीलांच्या सन्मानाचे संस्कार प्रहारचे सर्वेसर्वा ना. बच्चुभाऊ कडू यांचेकडूनच मिळालेले आहेत. भ्रष्टाचाराची सोय व्हावी म्हणून गणरायाच्या नावाने न.प. सत्ताधार्यांनी मनमानी करावी, गणेशभक्तांच्या भावना दुखवाव्यात, विकासाच्या नावाने वार्डा वार्डात वितृष्ट निर्माण करावे, सुलभ शौचालयातील पालीकेचे उत्पन्न वाढविणारे दुकान संकूल हेतुपुरस्पर स्थगीत करावे, तर आपल्यांची मर्जी संपादीत करण्यासाठी ज्यांनी संपूर्ण हयात भाजप मध्ये घालविली ते स्व. गजाननभाऊ पोटदुखे यांच्याच कुटूंबीयांचा विरोध असतांनाही तेथील काम सुरु ठेवण्यासाठी हट्ट धरावा, इंदीरा नगरातील बुध्द विहाराच्या संरक्षण भिंतीचे काम चतुराई करून बंद पाडावे यासाठी खटाटोप करावा, निविदेतील मलीदा लाटण्यासाठी नियमांची एैशीतैशी करावी, डोळे बंद करून दुध पिणार्या मांजरीला कोणी बघत नाही असे वाटत आहे तर पाच वर्षातील पालीकेचा गैरकारभार भ्रष्टाचाराच्या दलदलीत फ सला आहे, पालीकेचे अधिकारी न.प. सत्ताधार्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे.
विकास आराखड्याच्या नावावर गरीबांना विस्थापीत करावे व घरकुलाच्या यादीत आपल्याच लोकांना पंगतीत बसवायचे. यामुळे पालीकेला व्यवसायीक धंद्याचे दुकान बनवून सत्ताधारी या नंतर जनतेला उल्लू बनवू शकणार नाही. भाजपाच्या दिव्याखाली अंधार आहे, त्यामुळे भाजपाने झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवावी अन्यथा भाजपाच्या पालीकेतील भ्रष्टाचाराची लख्तरे चव्हाट्यावर आणल्या शिवाय प्रहार गप्प बसणार नाही. महीलांचा सन्मान आज भाजपाला आठवला आहे, परंतु पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या नावाची कमान कुतसीत राजकारणांमुळे तिन वर्षे भाजपाने प्रलंबीत ठवेली नसती याची त्यांनी जाण ठेवावी. प्रहारने आंदोलन करतांना तिथे हजर नसतांनाही गुन्हे दाखल केले, परंतु भाजपाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये 100-150 पेक्षाही जास्त कायकर्ते असुनही त्यात कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाल्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री अनिल गोपाळ यांना दिसू शकले नाही, त्यामुळे गलथानपणाचा हा गोपाळकाला प्रहार जनतेसमोर आणल्या शिवाय राहणार नाही.