Home Breaking News जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पशुवैद्यकीय विभाग

जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पशुवैद्यकीय विभाग

581

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोबती असलेले पशुधन विविध रोगाने आजरावर आणी उपचार करणारे पशुधन विकास अधिकारी वाऱ्यावर अशी अवस्था शेळीपालन करणारे आणी शेतकऱ्यांची झाली असल्याने जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पशुवैद्यकीय विभाग बऱ्याच दिवसापासून या विभागाच्या खूप तक्रारी होत्या त्याबाबत दिनांक २१ / ९ / २०२१ रोजी पार पडलेल्या यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत या बाबत पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी तक्रार करून पशुधनाशी संबंधीत विभागास चांगलेच धारेवर धरले , त्यानंतर यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांनी उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या प्रमुख उपास्थित तात्काळ पशुधनशी निगडीत असलेल्या सर्व पशुधन विकास अधिकारी यांची स्वतंत्र बैठक काल दि. २२ / ९ / २०२१ रोजी बैठकीचे आयोजन केले होते . या बैठकीत डॉ एस एन बढे , न्हावी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ एम सी पाटील, फैजपुरचे पशुधन विकास अधिकारी डॉ एन डी इंगळे , डांभुणीचे पशुधन विकास अधिकारी डॉ एम पी पाटील , यावलचे पशुधन विकास अधिकारी डॉ .आर सी भगुरे यांच्यासह नायगावचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ सि एस पाटील , हिंगोणा येथील . सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ . एन एम पाटील , डोंगर कठोऱ्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ .यु एन पवार , साकळीचे सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ . युवराज पाटील , आमोदा येथील सहाय्यक पशुधन अधिकारी डॉ . श्रीमती ज्योती पाटील, यावलचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ आर पी ढाके व भालोद येथील सहाय्याक पशुधन विकास अधिकारी डॉ व्ही बी पाटील आदी वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते .यांनी संपूर्ण तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची मिटिंग आयोजित केली त्या वेळी गटनेते शेखर पाटील आणी उपसभापती योगेश भंगाळे व गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील उपस्थित राहून पशुधन संदर्भातील नागरीकांच्या तक्रारींचा पाढाच वाचला सर्वांसमोर झालेल्या या तक्रारी मध्ये सुधारणा झाली नाही तर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकजआशिया यांच्या समक्ष तक्रार करणार शेतकरी नागरीकांना घेऊन जाऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या , त्याचा परिणाम म्हणुन आज सकाळ पासुन जाणवत असुन , अचानकपणे जे पशुधन विकास अधिकारी नागरीकांना महीनो महीने दिसत न होते ते आता पशु चिकित्सालयावर दिसु लागले आहे .याच पार्श्वभूमीवर आज यावल येथे गटनेते शेखर पाटील यांनी अचानक यावल येथील पशुचिकीत्साल्यात भेट देवुन येथील पशुवैद्यकीय असता त्या ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ आर सी भगूरे हजर होते काल झालेल्या बैठकीचा हा परिणाम असुन, सद्या शेतकामांचे दिवस असुन , पशुधनावर मोठया प्रमाणावर लाडी खुरपत व गोचळयांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने शेतकरी वेळेवर जनावरांचे उपचार होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले आहे. काल झालेल्या बैठकीत गटनेते शेखर पाटील व उपसभापती योगेश पाटील यांनी पशुधन अधिकाऱ्यांविषयी तक्रार केल्याने गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरल्पाने आज बदल झाल्याचे दिसुन आलं व पशुधनचिकीत्सालय उघडल्याचे व त्या ठीकाणी पशुधन डॉ हजर असल्याचे दिसत होते .

Previous articleकलोडे चौकात एका व्यक्तीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न
Next articleयावल येथे २४ सप्टेंबर रोजी नुतन उपनगराध्यक्ष करीता नगर परिषदची ऑनलाईन विशेष सभाचे आयोजन