Home Breaking News समाज मागासलेपणावर आधारीत शिक्षण , नोकरी व राजकीय क्षेत्रात ओबीसी समाजाला सन्मान...

समाज मागासलेपणावर आधारीत शिक्षण , नोकरी व राजकीय क्षेत्रात ओबीसी समाजाला सन्मान संधी मिळावी : लोकनेत्या प्रतिभाताई शिंदे

367

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

या देशात सर्व वर्गाना त्यांचा शैक्षणीक , आर्थिक व सामाजीक मागासलेपणावर आधारीत त्यांना शिक्षण, नोकरी व राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाली पाहीजे यासाठी आरक्षण देण्याची गरज आहे . म्हणुन आपल्याला या सर्व क्षेत्रामध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे मात्र याबाबत सातत्याने आपल्यावर अन्याय करण्यात आले आहे .आपल्या देशामध्ये १९३३नंतर कुठलीही जातीनिहाय जनगणना आज पर्यंत करण्यात आलेले नाही मंडल आयोगाने या१९३३च्या जनगणनेनुसार आपले ओबीसी लोकसंख्येचे प्रमाण ५२ % टक्के पकडण्यात आले यात ओबीसीचे आरक्षण हे २७ % टक्के आणी हा अन्याय करून ही ओबीसी समाजाचे हे आरक्षण कसे कमी करता येईल याबाबत दोन टक्के जाती असलेल्या समाजाकडुन करण्यात येत आहे अशी माहीती लोकसंघर्ष समितीच्या अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी यावल येथे संपन्न झालेल्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदच्या वतीने आढावा बैठकीत दिली . यावल येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सायंकाळी ५ , ३० वाजता संपन्न झालेल्या ओबीसी आरक्षण हक्क परिषदच्या आढावा बैठकीत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संजय पवार , मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक करीम सालार, अखिल भारतीय लेवा महासंघाचे अध्यक्ष विष्णु भंगाळे , सामाजीक कार्यकर्ते एजाज मलीक , आदीवासी तडवी भिल एकता मंचचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम .बी .तडवी सर , राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर , युवक राष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील, प्रशांत लिलाधर चौधरी, अमोल दुसाने , नरेन्द्र भागवत पाटील , मोहन एकनाथ सपकाळे, भागवत आस्वार आदी ओबीसी समाज बांधव याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी दिनांक २५ सप्टेंबर रोजी जळगाव येथील छ्त्रपती संभाजीराजे नाटय गृहात आयोजीत ओबीसी आरक्षण हक्क परिषद या कार्यक्रमासाठी ओबीसीचे जेष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ना . छगनराव भुजबळ , पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अन्सारी , आमदार कपील पाटील यांच्यासह आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार असुन समाज बांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकनेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी यावेळी उपस्थित समाजबांधवांना केले. याप्रसंगी एम बी तडवी यांनी ही आपले विचार मांडले .

Previous articleयावल येथे २४ सप्टेंबर रोजी नुतन उपनगराध्यक्ष करीता नगर परिषदची ऑनलाईन विशेष सभाचे आयोजन
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा वाचवला जीव