Home Breaking News प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा वाचवला जीव

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा वाचवला जीव

372

 

उषा पानसरे ,मूख्य कार्यकारी संपादक

सातारा, कराड : पुणे-बंगलोर नॅशनल हायवे (एन. एच. ४) कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत गुजरातमधील आनंद जिल्हा पोलीस गाडीचा मोठा अपघात झाला ही बातमी समजताच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व इतर पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पोलीस गाडीत अडकलेल्या सहा पोलिसांना स्वतःचे ट्रॅक्टर आणून बेल्टच्या सहाय्याने बाहेर काढले व अँब्युलन्समध्ये बसवून त्यांना पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर पोलीस गाडी गुजरातहून हुबळीकडे जात असतांना चुकून बाजूच्या डिवायडरला आदळल्याने पोलीस गाडीचा मोठा अपघात झाला आहे. सदर पोलीस गाडीत एकूण सहा पोलीस कर्मचारी होते. सर्वजन जखमी असून पोलीस चालकाच्या पायाला जबर मार लागला असल्याने दोन्ही पाय निकामी झाल्याचे बोलले जात आहे. या पोलीस बांधवांना रुग्णालयात दाखल करून जीवदान दिल्याबद्दल पोलीस बांधावानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. या उत्कृष्ट कार्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रविण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, कार्याध्यक्ष रणजीत मोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, संघटक श्रीनिवास माने, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पगार, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिलाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी महेश जाधव यांचे कौतुक केले आहे.

Previous articleसमाज मागासलेपणावर आधारीत शिक्षण , नोकरी व राजकीय क्षेत्रात ओबीसी समाजाला सन्मान संधी मिळावी : लोकनेत्या प्रतिभाताई शिंदे
Next articleसम्राट अशोक चौकाच्या पूर्वेकडील सिमेंट कमानीचे काम त्वरित थांबवा भीम नगरातील नागरिकांची मागणी