Home Breaking News हिंगणघाट डीबि पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीस केली अटक

हिंगणघाट डीबि पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीस केली अटक

273

 

हिंगणघाट दि.24 सप्टेंबर शहरातील तसेच समुद्रपुर येथील मोटरसायकल चोरीप्रकरणी दोन चोरटयांना हिंगणघाट पोलिसांचे डीबी पथकाने अटक केली असून त्यांचेकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात हिंगणघाट पोलिसांना यश मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहर पोलिसात अप क्र. 398/2021
कलम 379 भादंवि अन्वये दि. 27 एप्रिल रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बराच शोध घेऊन अद्यापपावेतो सुगावा लागला नसल्याने सदर चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे
सोपविण्यात आला होता.
यात डीबी पथकाने शोध घेऊन दोन्ही आरोपीस जेरबंद केले.
सदरच प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण यांनी डी.बी. पथकाला सदरचा गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. हिंगणघाट पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेतला असता सदर गुन्हयातील आरोपी नामे शेख मोहसीन शेख सलीम(25) रा.हिंगणघाट तसेच इसराईल उर्फ शाहीद रसुल खान पठाण(24) रा. समुद्रपुर या दुक्कलीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांना इंगा दाखविताच त्यांनी समुद्रपुर येथूनसुद्धा एक मोटरसायकल चोरल्याबाबतची कबुली दिली.
त्यांचेकडुन दोन्ही गुन्हयातील मोटरसायकली जप्त करण्यात आल्या.समुद्रपुर येथील दि. 06 ऑगस्ट रोजी दाखल असलेला
अप क्र. 291/2021 कलम 379 भादंवि चा गुन्हादेखील यावेळी उघडकिस करण्यात आला.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत
चव्हाण यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे,
सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

Previous articleसम्राट अशोक चौकाच्या पूर्वेकडील सिमेंट कमानीचे काम त्वरित थांबवा भीम नगरातील नागरिकांची मागणी
Next articleलासुरा बु येथे भक्तविजय ग्रंथांची सांगता