Home जळगाव यावल येथे उद्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्रातील शासनाच्या शेतकरी विरोधी...

यावल येथे उद्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वतीने केन्द्रातील शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरूद्ध भारत बंद आंदोलन

415

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

देशातीलपंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केन्द्र शासनाने देशाचा अन्नदाता बळीराजा शेतकरीला संपवणारे काळे कृषी कायदे आणून शेतकऱ्याचा हक्क हिरावणारया आणि आपल्या उघोगपती मित्रांचे खिसे भरणाऱ्या जुलमी अत्याचारी मोदी सरकार विरोधात २७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी सकाळी ८ , ३० वाजता यावल शहरातील भुसावळ टी पॉईंट जवळ काँग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्तरित्या भारत बंद आंदोलन करण्यात येणार असुन , तालुक्यातील पक्षातील सर्व पधदिकारी कार्यकर्ता आणी शेतकरी बांधव यांनी यात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे गटनेता जिल्हा परिषद जळगांव व तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल प्रा.मुकेश येवले सर , नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह दोघ पक्षातील पदाधिकारी यांनी केले आहे.

Previous articleतालुक्यातील राजोरा व हल्ली मुक्काम भुसावळ येथील प्रवीण श्रीपत भारंबे यांचा मुलगा शुभम भारंबे हा मास्टर ऑफ मेकॅनिकल इन मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी लंडन येथे नुकताच रवाना झाला आहे.
Next articleजागतिक फार्मासिस्ट दिनानिमीत्त रेडक्रॉस मेडिसीन बॅंक मार्फत आसराबारी आदीवासी पाडा वड्री येथे औषधीचे वाटप