7 आक्टोंबर
हिंगणघाट :- राजकीय अभय असलेल्या माजी आमदार पुत्राने एक नव्हे तर आतापर्यंत तिनं वेळा तलाठी, मंडळ अधिकारी यांचेवर अवैध वाळू चोरी प्रकरणात घातक शस्त्रनिशी हल्ला केलेला आहे. प्रत्येक वेळेस राजकीय दबावतंत्राचा वापर करुन प्रकरण दडपल्या जात असतांना यावेळी मात्र विदर्भ पटवारी संघ उप विभाग शाखा हिंगणघाट यांनी प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसह पटवाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्याल्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 5-10-2021 ला पारडी (नगाजी) ता. हिंगणघाट येथील तलाठी श्री. रवींद्र जाधव हे ईपीक पाहणीला जात असतांना, मार्गाने रेती घेऊन जात असलेले ट्रॅक्टर तपासणी करिता थांबवले असता सौरभ तिमांडे यांनी अचानक एका गाडीत चार पाच गुंड प्रवृत्तीच्या इसमांना घेऊन हातात तलवार घेऊन तलाठी जाधव यांचेवर प्राणघातक हल्ला चढवीला असता प्राण वाचवण्या करिता जाधव यांनी घटना स्थळावरून पळ काढल्या मुळे ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती जाधव यांनी तहसीलदार मासाळ यांना कळविल्यानंतर तहसीलदार पोलीस ताफासह घटनास्थळी हजर झाले परंतु तोपर्यंत आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले होते. घटनेची फिर्याद जाधव यांनी हिंगणघाट पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.
पटवारी संघटनेने यां प्रकरणात बेमुदत धरणे आंदोलनाची भूमिका घेतलेली असुन पोलीस यंत्रणा आरोपीवर काय करावाई करणार याकडे पटवारी व जनतेचे लक्ष लागून आहे.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा