Home Breaking News तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरण हे पुर्ण क्षमतेने भरल्याने घटस्थापना...

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरण हे पुर्ण क्षमतेने भरल्याने घटस्थापना व नवरात्रीच्या पहील्या दिवसाचे औचित्य साधुन विधीवत जलपूजन करण्यात आले.

682

 

 

यावल, (प्रतिनिधी)विकी वानखेडे

निंबादेवी धरणाचे यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील व हुमाशिका पराग पाटील यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निंबादेवी धरणावर संपन्न झालेल्या कार्यक्रमास दहीगाव ग्राम पंचायतचे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन , मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विक्की पाटील , नायगाव ग्राम पंचायतचे उपसरपंच रामदास पाटील , विधिध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विश्वास पाटील , नरेन्द्र देशमुख , राजु तडवी , अल्लाउद्दीन तडवी ,सातोद येथील प्रसन्ना महाजन , विकास पाटील , सावखेडा सिमचे माजी सरपंच सामिर तडवी , माजी उपसरपंच सैफ्फुल्ला तडवी , सावखेडा सिम ग्रामपंचायत सदस्य उस्मान तडवी, जिवराम बडगुजर , किरण पाटील , मुरलीधर कोळी , भगवान कोळी व सातपुडा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते . यावेळी परिसरात सुख शांती भरभराटी व पाण्याची कायम मुबलकता राहु द्यावी अशी प्रार्थना भोनक मातेला करण्यात आली .

Previous articleविदर्भ विकास आघाडी हिंगणघाट कडून लखीमपूर खेरी हिंसाचाराचा जाहीर निषेध
Next articleविलास भाटकर यांनी यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हणून प्रभारी पद स्विकारली