Home जळगाव यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

यावल येथे मा. कांशीराम साहेब यांची 15 वी पुण्यतिथी साजरी

363

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

डी. एस. फोर तसेच बामसेफ व बी. एस. पी. चे संस्थापक मा. कांशीराम जी यांचा 15 वा परिनिर्वाण दिवस साजरा करण्यात आला. बोरावल गेट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी चौकात साजरा करण्यात आला. तरी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. कांशीराम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच या कार्यक्रमांस निळे निशाण संघटनेचे ता. अध्यक्ष विलास भास्कर तसेच रोजगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे, तसेच निळे निशाण संघटनेचे जिल्हा उपअध्यक्ष अशोक तायडे तसेच संघटनेचे युवा ता. अध्यक्ष विशाल तायडे, तसेच शाखा अध्यक्ष अट्रावल भूषण संपकाळे, कैलास लोहार, ए. के. तायडे, विष्णू लोखंडे, राजू अडकमोल, भरत अडकमोल, विवेक तायडे, अविनाश भास्कर, अशोक मच्चीवाले, किशोर अडकमोल, सागर गजरे, राहुल गजरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज सोनवणे यांनी केले तर उपस्थित मंडळींचे आभार विलास भास्कर यांनी मानले.

Previous articleकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या संकेत वाघेचा श्रेयस वाचनालयाने केला सत्कार
Next articleचिमुकल्यासह देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महीलेचा रेल्वेखाली चिरडुन दुर्देवी मृत्यु