यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथे उद्या सोमवार रोजी राज्यातील महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी विरोधी केन्द्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद आवाहन दि. ११ ऑक्टोबर सोमवार महाराष्ट्र बंद उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या सरकार च्या मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून र्निदयीपणे मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चिड आणनारा आहे.
आपले भारत हे कृषी प्रधान देश असतांना या देशांमध्ये भारतातीलच शेतकरी गेली अनेक महिन्यापासुन आपल्या न्याय हक्कासाठी केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करूण आपले म्हणने सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे पंरतु वेळो वेळी हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केन्द्रातील सरकार च्या माध्यमातुन दाबण्याचा व आंदोलनास भरकटविनयाचा प्रयत्न करीत आहे.
पंरतु यामध्ये पुर्णत:यश आलेले नाहीत.शेतकरी आंदोलन साम,दाम, दंड, भेद, वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा सरकारने चालविला आहे.अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे रहाणे गरजेचे असून या निर्देयी कृतयााचा निषेध म्हणून दि. ११ ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात यावा असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व शिवसेना, यांच्या तर्फे बंदचे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे
गटनेता जिल्हा परिषद जळगांव तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रा.मुकेश येवले सर(नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ),रविभाऊ सोनवणेतालुका प्रमुख शिवसेना यांनी केले आहे .