Home बुलढाणा पिकविमा वाटपात अन्याय झाल्याबद्द्ल व चालू खरिपातील नुकसानीबाबत जामोद सर्कल मधील नागरिकांचे...

पिकविमा वाटपात अन्याय झाल्याबद्द्ल व चालू खरिपातील नुकसानीबाबत जामोद सर्कल मधील नागरिकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

577

 

गजानन सोनटक्के

जळगांव दि 14: जामोद मंडळ सर्कल मधील नागरिकांच्या वतीने आज दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन त्यात नमूद करण्यात आले की सोयाबीन व इतर पिक उत्पादक शेतकरी असून आम्ही सन 2020 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत रिलायन्स जनरल इन्सुरंस कंपनीचा सोयाबीन पिकाचा पीकविमा काढला होता. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आमचे 100% सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. नुकसानीचे प्रमाणानुसार आम्हाला 100% नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून मिळणे गरजेचे आहे. मात्र सदर विमा कंपनीने जामोद मंडळ सर्कल मधील विमा काढलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला असून एकरी 1200/- रुपये ते 1600/- इतकी तुटपुंजी रक्कम आमच्या खात्यावर नुकतीच जमा केली असून एक प्रकारे शेतकऱ्याची विमा कंपनीने थट्टाच केली आहे. वास्तविक जामोद मंडळ सर्कल ला लागुनच असलेल्या वडशिंगी सर्कलमध्ये पिक विम्याची रक्कम एकरी 10 ते 12 हजार रुपये दिली आहे. तसेच जामोद मंडळ सर्कल मधील यापुर्वी ऑनलाइन तक्रार करण्याऱ्या काही शेतकऱ्याच्या खात्यावर एकरी 6000 ते 8000 रुपये प्रमाणे विमा मिळाला आहे. अशा प्रकारे पीकविमा भरपाई रक्कम वाटप करतांना विमा कंपनीने नाहक भेदभाव केला आहे. यावरून आमच्या सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबतचा कृषी विभाग, महसूल विभाग व विमा कंपनी प्रतिनिधी यांनी चुकीचा अहवाल सादर केला असावा. त्यामुळे केवळ जामोद मंडळ सर्कल मधील शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी पिकविमा नुकसानीची रक्कम मिळाली आहे.
तसेच सन 2021 मध्ये जामोद मंडळ सर्कल मध्ये पिक लागवडी चे वेळी हवामान बदलामुळे पावसाचा जवळपास एक ते दीड महिन्याचा खंड पडून सुद्धा जामोद मंडळ सर्कल मदतीपासून हेतू पुरस्पर वंचित ठेवण्यात आला. व सप्टेंबर 21 व ऑक्टो 21 मध्ये झालेल्या संततधार पावसामुळे पिकाचे नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने हेतु पुरस्पर आज पर्यंत केल्या गेले नाही. तरी या तक्रारींचे आपल्या कार्यालयामार्फत निदान करण्यात यावे अन्यथा आपला कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य सौ रुपाली काळपांडे, पंचायत समिती सभापती रामेश्वर राऊत ,उपसभापती महादेवराव धुर्डे, सरपंच रामेश्वर अंबडकार,गुणवंतकाका कपले,अशोक काळपांडे, सुरेश अंबळकर ,रमेश वंडाळे,पुंडलिक पाटील, विजय वंडाळे ,मोहन राजपूत ,विकास धुळे,व इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

Previous articleरिलायन्स कंपनीकडून तुटपुंजा विमा देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा
Next articleबोलोरो व मोटरसाइकिल मधे अमोरा समोर धड़क एक मृतु तर एक जख्मी