Home Breaking News अल्पवयीन मुलींला रस्तायात अडवून विनयभंग

अल्पवयीन मुलींला रस्तायात अडवून विनयभंग

556

 

Surya marathi news

अल्पवयीन मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा पाठलाग करून विनयभंग केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका प्रकरणात पिंपरी तर दुस-या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी तिघांना आरोपीना अटक केली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडित मुलीने शनिवारी (दि. 16) फिर्याद दिली. की त्यानुसार सैफी अस्लम शेख (वय 22, रा. दत्तनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपले दररोज वेलेनुसार ट्युशनसाठी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुण . 16 ऑक्टोबर रोजी मुलीला भर रस्त्यात अडवून तिचा हात पकडून माझे सोबत मैत्री करशील का, असे विचारले. मुलींना नकार देताच तिला धमकी देऊन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
निगडी पोलीस ठाण्यात देखील एका अल्पवयीन पीडित मुलीने फिर्यादी दिली आहे. त्यानुसार पृथ्वीराज दत्ता पाटील (वय 23), दत्तात्रय लहू पाटील (वय 47, दोघे रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांच्या विरोधात पन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी पृथ्वीराज हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपीने शुक्रवारी रात्री नऊ वाजता प्राधिकरण निगडी येथे मुलीवर नजर ठेवली. व तिला शिवीगाळ करुण मारहाण केली. सोशल मीडियावर वेगवेगळे अकाउंट सुरु करून त्यावरून पीडित मुलीला धमकी दिली. निगडी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरु आहेत.

Previous articleआवार गावातील विठ्ठल मंदिराच्या कळसावर वीज कोसळली मंदिरावरील घुमटाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Next articleसाईबाबा नागरी सह पत संस्थेची 18 वी सभा संपन्न .