उषा पानसरे कार्यकारी संपादक मो. 9921400542 असदपूर
रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर रोजी डॉ. राणी चौधरी ,होमिओपॅथिक तज्ञ अमरावती यांनी श्री स्वामी समर्थ केंद्र रहाटगाव येथे निशुल्क आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले. या शिबिरामध्ये ५० पेक्षा जास्त रुग्णांची आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार करण्यात आले. शिबिरामध्ये बोलताना डॉ. राणी चौधरी यांनी होमिओपॅथीमध्ये उपचार पद्धती बद्दल मार्गदर्शन केले. होमिओपॅथी ही अतिशय सशक्त व नैसर्गिक उपचार पद्धती आहे. या पॅथीमध्ये सगळ्या आजारांवर तसेच अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत औषधोपचार केले जातात. रुग्णांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात घेऊन औषधी दिल्या जातात. शरीर आणि मन यांना आपण विभक्त करू शकत नाही. त्यामुळे आपल्या विचार शैलीचा आपल्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होत असतो. म्हणून विचारांमध्ये सकारात्मकता, समतोल आहार ,नियमित व्यायाम, रोज सकाळी फिरायला जाणे या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या गेल्या तर निश्चितच आपले आरोग्य आपल्या हाती राहील असे डॉ. राणी चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले . तसेच श्री. स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष श्री. बोरखडे सर व सौ. बोरखडे मॅडम यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.