Home Breaking News खुनाच्या आरोपाखाली सजा भोगत असलेल्या संगीत इंगळेचा सख्ख्या मुलानेच केला खात्मा (मर्डर)

खुनाच्या आरोपाखाली सजा भोगत असलेल्या संगीत इंगळेचा सख्ख्या मुलानेच केला खात्मा (मर्डर)

1375

 

SURYA MARATHI NEWS

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत राजाराम इंगळे ह्याचा त्याच्या सख्या मुलानेच एका मित्राच्या मदतीने गुरुवार दी.21आक्टोबर च्या रात्री घरातील लाकडी दांड्याने डोक्यावर जोरदार प्रहार करुन राहत्या घरातच खुन केल्याची घटना दुसरे दिवशी सकाळी गांवकर्यांना समजताच सर्वत्र खळबळ माजली .
ह्या घटनेबाबत अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले की ,मागील दहावर्षापुर्वी संगीत राजाराम इंगळे ह्याचे हातुन गावातील च गणेश मुकींदा इंगळे ह्याचा गुप्तीने भोसकून खुनकरण्यात आला होता .त्या प्रकरणात तेव्हापासून संगीत हा जेल मध्ये सजा भोगत होता .अलीकडे काही दिवसांपूर्वी तो पँरोल वर काही दिवसासाठी घरी आला होता .त्याला दोन मुली आणि एक मुलगा असुन मोठ्या मुलीचे लग्न दोन वर्षांपूर्वी आटोपले आहे. संगीत हा गावात आल्यावर त्याच्या मित्रांसोबत राहत असतांना पुर्वी प्रमानेच मोठ्या प्रमाणात मद्यपान करीत होता .त्याचा प्रचंड त्रास पत्नी ,मुलगी आणि मुलाला होत होता .पैशासाठी तो आपल्या पत्नीला तसेच मुलाला नेहमी त्रास देत असायचा तसेच घरात भांडण तंटा सुद्धा करायचा .दोन महिण्यापुर्वी बाप लेकांमध्ये कडाक्याचे भांडण सुद्धा झाले असून एकमेकांनी तामगांव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी सुद्धा केल्या आहेत .घटनेच्या दोन दिवस अगोदर सुद्धा बापलेकांमध्ये खडाजंगी झाली होती .
बाप दारू पिवुन आपल्या आईला ,बहीणीला दररोज शिविगाळ करतो आणि मारुन टाकण्याच्या धमक्या देतो ही बाब मुलाच्या आवाक्या बाहेर गेल्याने त्याने शेवटी बापाचा कायम काटा काढण्याच्या इराद्याने राहत्या घरातच लाकडी दांड्याने डोक्यावर वार करून तेथेच मारुन टाकले .आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मित्राचा सहारा घेवुन मयत संगीत याला चादरी मध्ये गुंडाळून घरापासून अर्धा किलो मिटर अंतरावरील जळगाव वरवट रोडच्या कडेला टाकून पोबारा केला.अशी माहिती मिळाली आहे .
तामगांव पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान रात्री तिन ,साडेतीन च्या दरम्यान संग्रामपूर वरुन वरवट कडे येतांना मधुकरराव बकाल ह्याच्या शेता जवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला संगीत चे प्रेत दिसून येताच त्याच क्षणापासून पोलिसांचे तपास चक्र सुरु झाले .पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून सकाळ पासून च झालेल्या तपासणी त रस्त्यावर रक्ताचे निशाण दिसुन आले .नवु वाजताच्या सुमारास स्वान पथक दाखल झाले असता पथकातील स्वानाने थेट मयताचे घरच गाठले तसेच मयताला ज्या चादरी त गुंडाळून नेल्या गेले होते तसेच मारहाणीत जो लाकडी दांडा आणि दगड वापरात आणला होता त्या सर्व वस्तू पोलिसांच्या लक्षात आणून दिल्या .
पोलिसांनी ह्या घटणेत आरोपी अप क्रमाक 323,/2021कलम 302,221,34 भादवी नुसार गुन्हा दाखल करून असलेल्या संगीत च्या मुलाला ताब्यात घेतले असुन त्याला सहकार्य करणारा दुसरा आरोपी फरार असल्याचे सांगितले आहे .पुढील तपास पो,नि, उलेमाले यांचे मार्गदर्शन खाली पो,उ,नि, श्रीकांत विखे करीत आहेत

 

Previous articleनियोजन शुन्य आमदार आणि खासदाराची बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत व जनतेच्या इतरही कामाबाबत अनास्था
Next articleलातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांची बिनविरोध निवड