Home Breaking News टायरच्या दुकानाला भीषण “आग”

टायरच्या दुकानाला भीषण “आग”

343

 

SURYA MARATHI NEWS

कोणत्याही जीवित हानि नाही

ठाणे – घोडबंदर रोडवरील या कासारवडवली नाक्यावर असलेल्या माजोज टायर या शॉपला आज शनिवारी सकाळी आग लागली. व हे दुकान तळ अधिक सात मजली कृष्णा ग्रीनलँड पार्कच्या तळ मजल्यावर आहे. व या दुकानाला
सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच आतून धूर येण्यास सुरुवात झाली व अचानक आगीने भीषण रूप धारण केल्याने एकच खळबळ उडाली होती. व यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.व
मनोज गिरी यांच्या मालकीचे CEAT माजोज नामक टायरचे दुकान असून सकाळीच दुकान उघडण्यापुर्वीच दुकानातून धूर येण्यास सुरुवात झाली होती हळूहळू धूर वाढून अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल,महानगर गॅसचे अधिकारी आणि कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी, एक फायर इंजिन, एक-रेस्क्यू वाहन, एक-जम्बो वॉटर टँकर आणि एक-जेसीबी पाचारण केले होते. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात असून दुकानात सकाळीच धूर येत असताना अचानक आगीने भीषण रूप धारण केले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झालेली नाही. या आगीत फक्त टायर एकाच दुकानाचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
Surya marathi news

Previous articleस्टेट बँकेवर दरोडा, तिजोरी फोडून 20 लाख पळविले, पोलीस तपास सुरू..
Next articleविविध विकास कामांचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते