विकी वानखड़े जळगाव जिल्हा प्रतिनिधि
यावल : येथे बऱ्हाणपूर- अंकलेश्वर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर एका अवैध बायोडिझेल पंपावर नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (Special Inspector General of Police) यांच्या पथकाने छापा (Squad Red) टाकला.ही कारवाई रविवारी (ता.३१) रात्री उशिरा करण्यात आली असून, या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राज्यमार्गावर चोपडा रस्त्यावर एका ठिकाणी बायोडिझेलच्या नावाखाली केमिकल मिश्रित डिझेल विक्री होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक यांना माहिती मिळाली होती. या माहितीनुसार रविवारी (ता. ३१) रात्री उशिरा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला व दोन जणांना ताब्यात घेतले असून, संशयितांची नावे अद्याप समोर आली नाहीत.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. यात एकूण कितीचा मुद्देमाल आहे, याबाबत देखील रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पन या कारवाईमुळे यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Surya marathi news