शेगाव: शुल्लक कारणावरून अश्लील शिवीगाळ व चाप्ता बुक्क्यांनी मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळा बुद्रुक येथील उघड्यावर मटण विक्री व तंबाखूजन्य पदार्थ वेधरित्या विक्री बाबत गोपाल हरिभाऊ कान्हेरकर वय 26 वर्ष यांनी त्यांच्या मोबाईलवर स्टेटस ठेवले होते आरोपी विनोद ध्रुव सावदेकर त्यांच्या घरासमोर आला व त्याने आमची बाई सरपंच आहे तू सरपंच व उपसरपंच यांची बदनामी का करत आहे असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली व चाप्ता बुक्क्यांनी मारहाण करून तुला पाहून घेतो अशी धमकी दिली फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट व मेडिकल सर्टिफिकेट वरून आरोपी विनोद सावदेकर विरुद्ध कलम 294 323 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पीएसआय निलेश डाबेराव करीत आहेत