शेगाव: दिनांक ८/११/ २०२१ पासून नवीन नियम लागू सर्व शासकीय कार्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कोरोना ची लस घेतली असेल तर त्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय प्रवेश घेता येणार नाही.त्यामध्ये तहसील कार्यालय ,तलाठी कार्यालय ,तुमच्याजवळ जर लसीचे चे प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला तलाठी कार्यालयामधून उत्पन्न दाखला मिळणार नाही किंवा तहसील मधून तुम्हाला जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर किंवा उत्पन्नाचा दाखला हा सुविधा सर्व कागदपत्र सोबत तुम्हाला लस घेतल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे असा आदेश तहसीलदार तहसीलदार यांनी तहसील कार्यालयामध्ये असे फलक लावले आहेत. तरी सर्व नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.