Home Breaking News यावल येथील विवाहितेचा शेगाव येथील सासरच्या मंडळीचा छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा...

यावल येथील विवाहितेचा शेगाव येथील सासरच्या मंडळीचा छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

1503

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

वराच्या मंडळीस लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिले नाही म्हणून विवाहितेला मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह आठ जणांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी ८ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल येथील माहेर असलेल्या मोनिका मिलींद ताडे (वय-२६) रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांचा विवाह मिलींद अनिल ताडे यांच्याशी रितीरिवानुसार झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती मिलींद याने विवाहितेला लग्नात व्यवस्थित हुंडा व पैसे दिली नाही. या कारणावरून शिवीगाळ करणे व मारहाण करणे सुरू केले. तसेच सासू, आजल सासू, मावस सासू यांनी देखील विवाहितेला शिवीगाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता यावल येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून सोमवारी ८ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ६ वाजता यावल पोलीस ठाण्यात पती मिलींद अनिल ताडे, सासू राजकन्या अनिल ताडे, मामे भाऊ सुमित प्रल्हाद विधाते, गैनिनाथा श्रीराम विधाते, आजल सासू कमलबाई श्रीराम विधाते, सुमित्रा विलासराव सौदागरे, रविंद्र भोजकर आणि मिरा भोजकर सर्व रा. माटरगाव ता. शेगाव जि. बुलढाणा यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉँस्टेबल असलम खान हे करीत आहे .

Previous articleग्रामसेवकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आ. शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा ग्रामसेवक संघटना आक्रमक; तहसीलदारांना निवेदन
Next articleरविकांत तुपकरांच्या प्रयत्नाने वन्यप्राण्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकनुकसानीसाठी ३ कोटी ३० लाखांची मदत मिळाली