घुग्घुस प्रतिनिधि
रमेश सूद्धाला
बुधवार 10 व गुरवार 11नोव्हेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दरम्यान नकोडा येथील वर्धा नदीच्या तिरावर उत्तर भारतीय बांधवातर्फे छट पूजेच्या पर्वाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.
घुग्घुस परिसरातील उत्तर भारतीय बांधव दर वर्षी छट पूजेचा पर्व उत्साहात साजरा करतात मागील पाच वर्षा पासून याठिकाणी छट पूजा पर्वाचे आयोजन करण्यात येत आहे.
सकाळी उगवत्या सूर्याला व सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्क वाहून हा पर्व साजरा करण्यात येतो तसेच माता ही आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.
नदीच्या तिरावर दिवे लावण्यात आले तसेच खेळणीचे दुकाने थाटण्यात आली होती.
याप्रसंगी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा जिप सदस्य बिरजू पाझारे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर यांनी भेट देऊन उत्तर भारतीय बांधवाना छट पूजा पर्वाची शुभेच्छा दिली.
यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रत्नेश सिंग, डॉ. सुनील राम, अनिल वर्मा, कुबेर वर्मा, रविश सिंग,गोपाल वर्मा, रामजी सिंग, राजकुमार सिंग, अश्विनी सिंग, अरविंद गुप्ता, मानस सिंग, विवेक तिवारी, कृष्णा शाह, रवी सिंग, सुमेर सिंग, प्रीतम शर्मा, अभिजित सिंग, सुरज सिंग, विनय व मोठया संख्येत पुरुष, महिला, मुलं,मुली तसेच वयोवृद्ध सहभागी झाले होते.