दगडू पिंगळे
निलंगा प्रतिनिधी
निलंगा नगरपालिकेच्या वतीने निलंगा शहरात झालेल्या विविध विकासकामाचे लोकार्पण व नवीन कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक 12/11/ 2021 वार शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता निलंगा नगरीचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वराचे दर्शन घेऊन
अरविंद भाऊ पाटील निलंगेकर (प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र)यांच्या अध्यक्षतेखाली
माननीय आ. श्री संभाजीराव दिलीपराव पाटील निलंगेकर.
(महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा विधानसभा सदस्य निलंगा)यांच्या शुभ हस्ते
मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाची लोकार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.
मा.श्री. सुधाकर शृंगारे(लोकसभा सदस्य लातूर) माननीय. आमदार रमेश आप्पा कराड (अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा लातूर)
माननीय श्री राहुल केंद्रे जिप अध्यक्ष लातूर, सौ भारत बाई साळुंके जिप उपाध्यक्ष लातूर, संजय दोरवे, माजी सभापती तथा जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
तरी यावेळी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे
बाळासाहेब ( श्रीकांत) शिंगाडे नगराध्यक्ष निलंगा
मनोज कोळ्ळे उपनगराध्यक्ष निलंगा समस्त सभापती नगरसेवक निलंगा इत्यादींनी केले आहे.