Home Breaking News कॉंग्रेस आमदाराच्या मुलाची स्वता: वर गोळी झाडून केली आत्महत्या

कॉंग्रेस आमदाराच्या मुलाची स्वता: वर गोळी झाडून केली आत्महत्या

546

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

SURYA MARATHI NEWS

जबलपूर :  येथील बरगी काँग्रेस आमदार संजय यादव यांचा धाकटा मुलगा वैभव यादव (विभू) याने गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून घेतत्या ले हळहळ वक्त होत असून सदर घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडली असली तरी त्यात त्या आत्महत्येचे कारण लिहिलेले नाही.
विभूने सगळं गोष्ट छान लिहिलंय. आहे व त्यामुळे सर्व काही ठीक असताना त्याने आत्महत्या का केली, हे पोलिसांनाही अजुन समजू शकलेले नाही. तर
ही घटना घडली त्यावेळी आमदार वडील संजय यादव हे 15 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी अधिवेशनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि आई भोपाळला गेली होती. वैभवचा मोठा भाऊ काही कामानिमित्त घराबाहेर गेला होता, यावेळी वैभवने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आणि वडिलांच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वत:वरच गोळी झाडली.
आई, बाबा आणि भाऊ सगळे चांगले आहेत…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभवने आत्महत्येपूर्वी सुमारे चार पानांची सुसाईड नोटही ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्याच्या सुसाईड नोटमध्ये वैभवने आई-वडील, भाऊ आणि मित्रांचे कौतुक केले आहे. यासोबतच वैभवने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी त्याच्या काही मित्रांना मेसेजही पाठवला होता, ज्यामध्ये तो त्याच्या मित्राकडे जात असल्याचे लिहिले होते. तुम्ही सगळे खूप चांगले मित्र होता.

तुम्ही सर्व खूप छान आहात.
विभूने त्याच्या पाच मित्रांना टेक्स्ट मेसेज पाठवले होते. त्यात त्याने लिहिले की, “तुम्ही सर्व खूप चांगले आहात, स्वतःची काळजी घ्या. मी सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिलं आहे की, “माझे आई-वडील आणि भाऊ सर्व ठीक आहेत. माझी त्यांच्याविषयी काही तक्रार नाही. मी आता माझ्या मित्राकडे येत आहे.” कुटुंबाला मानसिक धक्का
या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. विभू मानसशास्त्र शिकत होता. पुढील शिक्षणासाठी तो परदेशात जाणार होता. पण जीवनाचा हा प्रवास सुरू होण्यापूर्वीच त्याने संपवला. व त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. व आमदार संजय यादव यांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि नेते रुग्णालयात पोहोचले. व तत्पर पोलिसांच्या पथकानेही या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व पोलीस आणि एफएसएलच्या पथकाने ताबड़तोब आमदार निवास गाठून घटनास्थळाची पाहणी केली.व पोलीस सर्व बाजूंनी तपास सुरु आहेत. Surya marathi news

Previous articleभूमिपूजन व लोकार्पण सोहळा
Next articleघुई येथे जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने यांच्या हस्ते धम्म ग्रंथाची समाप्ती