Home Breaking News यावल तालुका विधी सेवा प्राधिकरण व यावल तालुका वकील संघातर्फे सुरू करण्यात...

यावल तालुका विधी सेवा प्राधिकरण व यावल तालुका वकील संघातर्फे सुरू करण्यात आलेल्या कायदेविषयक शिबीराची रविवारी १४ नोव्हेम्बर रोजी सकाळी १० वाजता रॅली काढून सांगता करण्यात आली.

1276

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावल तालुका विधी सेवा प्राधिकरण व यावल तालुका वकील संघातर्फे २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान कायदेविषयक जनजागृती शिबीर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी घेण्यात आला. या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबीराची सांगता म्हणून आज रविवारी १४ नाव्हेंबर रोजी यावल न्यायालय येथून सायकल रॅली व पायी काढून शिबीराची सांगता करण्यात आली.

ही रॅली न्यायालयातून निघून यावल शहरातील प्रमुख मार्गावरील श्रीराम किराणा, बेहडे शॉपी, युसुफ बँड, म्हसोबा मंदिर, महाजन गल्ली, बोरावल गेट, पोस्ट ऑफिस मार्ग, नगरपरिषद या मार्गाने निघालेली रॅली परत न्यायालयात आली. न्यायालयाचे आवारात सदर महोत्सवाचा समारोपाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या. एम.एस. बनचरे, सहन्यायाधीश व्ही.एस. डामरे, वकील संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, सचिव अॅड. एन.पी. मोरे, वकिल संघाचे अॅड .शशिकांत वारूळकर, अजय बढे, हेमंत फेंगडे , विधी विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Previous articleघुग्घुस भाजपातर्फे पेट्रोल व डिझेल भाववाढ कमी करण्यासाठी निषेध आंदोलन
Next articleमाझा सत्कार हा चुंचाळे गावाचा सत्कार आहे कारण मला माझ्या गावानेच घडवले आहे-सैनिक कैलास लोहार. चुंचाळे येथे भारतीय बहुउद्देशीय संघ शाखा अनावरण,कोरोणा योद्धांचा सन्मान व ग्रंथालयाचा शुभारंभाचा कार्येक्रम संम्पन्न.