Home Breaking News घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार निर्भीड पत्रकारांचा” कार्यक्रम संपन्न

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार निर्भीड पत्रकारांचा” कार्यक्रम संपन्न

334

पत्रकार हा समाजाचा आरसा- विवेक बोढे यांचे मनोगत

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात “सत्कार निर्भीड पत्रकारांचा” कार्यक्रम घेऊन *घुग्घुस शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात* भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आला

घुग्घुस शहरातील जेष्ठ पत्रकार दया तिवारी, श्रीकांत माहुलकर, मनोज कनकम, सुरेश खडसे, संजय पडवेकर, हनीफ मोहम्मद, इम्तियाज रज्जाक, नौशाद शेख, प्रशांत चरडे, हसन शेख, विक्की गुप्ता, पंकज रामटेके, राहुल चौधरी, प्रणय बंडी, दशरथ आसपवार, हनीफ शेख, देवानंद ठाकरे, कल्याण सोदारी, सदन रेनकुंटला,रमेश सुध्दाला, करण कोलगुरी, राजेंद्र मेश्राम या पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले देशात दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय वृत्तपत्र दिवस आपल्या देशात स्वतंत्र व जबाबदारी चे प्रतीक आहे. हा दिवस देशभरात पत्रकार व भारतीय पत्र परिषदेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो जो विरुद्ध परिस्थितीत सत्य देशाच्या व समाजाच्या समोर आणतो. भारतात 4 जुलै 1966 रोजी पत्र परिषदेची स्थापना करण्यात आली व 16 नोव्हेंबर पासून या पत्र परिषदेने काम करणे सुरु केले. भारतीय पत्र परिषद विश्वासहर्ता अबाधित ठेवण्यासाठी सर्व पत्रकरिता गतीविधीवर नजर ठेवते. पत्रकारिता ही कोणाच्याही दबावाखाली व प्रभावाखाली असू नये ती निष्पक्ष असावी.

यावेळी माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, भाजपाचे विनोद चौधरी, अमोल थेरे, सिनू इसारप, साजन गोहने, संजय भोंगळे, शरद गेडाम, श्रीकांत सावे, अनंता बहादे, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, मोमीन शेख, विवेक तिवारी, अजय आमटे, अनिल मंत्रिवार, भारत साळवे, सुरेंद्र भोंगळे, मानस सिंग, सुशील डांगे, पियुष भोंगळे, प्रणय बोकडे, उपस्थित होते.

Previous articleचिखलीतील आनंद इलेक्ट्रॉनिकवर सशस्त्र दरोडा ; दुकान मालक कमलेशभाऊ पोपट यांची हत्या 
Next articleलोणारच्या बसस्थानकामध्ये शुकशुकाट ! संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होत आहेत हाल