शेगाव: दोन भिन्न धर्मात तेढ निर्माण करणारे आक्षेप आर्य स्टेटस सोशल मीडियावर ठेवणाऱ्या दोघा तरुणाविरुद्ध जलंब पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे याबाबत जलम पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा येथे कथित घटनेच्या बाबतीत राज्यात ऱ्याच जागी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना जलम पोलीस पेट्रोलिंग करीत असताना 16 नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी माटरगाव बुद्रुक येथे शेख इरफान शेख आश्रम वय 26 व आश्रम खान अफसर खान वय 18 दोघे राहणार माटरगाव बुद्रुक यांनी त्यांच्या मोबाईल अँड्रॉइड मध्ये दोन भिन्न धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन त्यांचे एकमेकाबद्दल द्वेषाची भावना निर्माण होतील व शांततेचा भंग होईल अशाप्रकारची आक्षेपार्य व्हिडिओ स्टोरी स्टेटस ठेवले याबाबत पोलीस हवालदार संजय पहूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरुद्ध कलम 153 अ, भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास जलंब पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटेकाडे करीत आहेत