घाटसावलि :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्याकरिता महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक गाव शिवारातील पांदन रस्त्याचे लोकसहभागातून मातीकरण करणे ,पांधन रस्ते अतिक्रमणमुक्त करणे चा उपक्रम जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनात हिंगणघाट तालुक्यात राबविल्या जात आहे याच उपक्रमात हिंगणघाट उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग ते जुनी घाटसावलि पांधन चे मातीकरण व अतिक्रमणमुक्त करण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले.
अन गावकऱ्यांच्या पांधन बाबतच्या समस्या जाणून घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले दलदलीचा रस्त्याने दोन किलोमीटर पायदळ जाऊन स्वतः पाहणी करून महसूल अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले .
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय घाट सावली चे सभागृहात उपविभागीय अधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत महसूल विभाग कडून राबविण्यात येणाऱ्या फेरफार अदालत व इतर उपक्रमाची सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिली. या भूमिपूजन कार्यक्रमात श्री समशेर पठाण नायब तहसीलदार हिंगणघाट, संजय भोंग मंडळ अधिकारी अल्लीपूर, दीपक अंधारे तलाठी कुटकी, सौ निलीमा डेहने सरपंच , ग्रामपंचायत सचिव हिवज, गजानन डेहणे ,रवी उमक ,माजी सरपंच गाढवे यासह मोठ्या प्रमाणात गावकरी हजर होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा