Home Breaking News नदीत उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली

नदीत उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली

1230

 

हिंगणघाट दि.२३
स्थानिक विर भगतसिंग वार्ड येथील २२ वर्षीय तरुणी कु.आशु प्रविण मेंढे हिने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताचे दरम्यान उघडकिस आली.पोलिसांनी शोध घेतला असता मृतक तरुणीचे शव राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पात्रात पोलिसांना शोध घेतांना मिळाले.
मृतक तरुणी शहरातील खाजगी दवाखाण्यात काम करीत होती,सदर तरुणी कालपासून घरुन बेपत्ता असल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत नोंदविण्यात आली होती.
राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदीच्या पुलावर एका इसमाला काल सोमवारी सायंकाळी लेडीज बॅग पडून असल्याचे आढळून आले होते,सदर इसमाने याची माहिती वडनेर पोलिस ठाण्यात दिली. मात्र हे प्रकरण हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने वडनेर पोलिसांनी याची हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी वणा नदी पुलाजवळ जाऊन या प्रकरणाची शहनिशा केली असता लेडीज पर्स आढळून आली.सदर तरुणीने वणा नदी पात्राता उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशा संशयावरून आज मंगळवारी २३ नोव्हेंबरला पोलिसांनी वणा नदी परिसरात शोधकार्य सुरू केले असता उपरोक्त तरुणीचा मृतदेह मिळाला असून तिची मेंढे कुटुंबियातील मुलगी असल्याची ओळख पटली.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गिरिधर पेंदोर, सोमनाथ टापरे यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी केली.

Previous articleकृषी विद्यापीठातील सोयाबीन केंद्र अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत.
Next articleदेवराव भोंगळे यांच्या वाढदिवसनिमित्त ४०० रक्तदात्यांचे अमरावतीला महादान.