Home Breaking News महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) तर्फे हिवाळी परिक्षा ऑंन लाईन आणि ऑंफलाईन पद्धतिने...

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) तर्फे हिवाळी परिक्षा ऑंन लाईन आणि ऑंफलाईन पद्धतिने घ्या अन्यथा विध्यापिठात आंदोलनचा ईशारा.

194

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

महाराष्ट्र स्टुडंट युनियन (मासु) हे महाराष्ट्रभर विद्यार्थ्याच्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्याचा कार्य करतांना पाहिले आहे.
आज सुद्धा जिल्हा अध्यक्ष शेख मोबिन शेख रहेमान /संग्रामपूर तालुका अध्यक्ष मोहम्मद तौसीफ जमदार यांनी विद्यार्थ्यांसाठी लढण्याचे आवाहन केले आहे.त्यानी मेल द्वारे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु,तसेच गव्हर्नर ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्री महोद्य़ उद्य़ सावंत यांना पाठवण्यात आला.त्यानी त्या मेल मध्ये स्पष्ट लिहले कि हिवाळी परिक्षा ऑंनलाईन आणि ऑंफ लाईन घेण्यात यावी.
गेल्या काहि वर्षि परिक्षा हे ऑन लाईन देन्यात आल्या.आता सुद्धा काहि ठिकानि सुरु आहेत.परंतु शासना ने २० ऑक्टोंबर पासुन महाविद्यालय ऑफलाईन पद्धतिने सुरु केले.
७५% ते ८०% अभ्यासक्रम हे ऑनलाईनच शिकवण्यात आले आहे.
संध्या महाराष्ट्रांत सुरु असलेल्या एस.टी.कामगारांचा संप,रेल्वे प्रवास बंद जर दळणवळणाची मुख्य व्यवस्थाच बंद आहे तर मग विद्यार्थी आँनलाइन शिकवून आँफलाइन परीक्षेसाठी कसे पोहचणार याचा विचार ना मंत्री महोदयांनी केला नाही विद्यापीठ स्तरावर केला जात आहे.

आमचा आँफलाइन शिक्षणाला विरोध नाही मुळात आमची ही सुरवातीपासूनचीच मागणी राहीलेली आहे की शिक्षण ऑफलाईन सुरु करा म्हणून. उन्हाळी सत्राच्या परीक्षा व तासिका आँफलाइन पद्धतीने घेण्यात यावे त्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक दृष्टया स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल व त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती देऊ शकता.

राज्यामधे ११ अकृषी विद्यापीठ आहे.त्यातून मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालय हिवाळी परीक्षा आँनलाइन पद्धतीने घेणार आहेत जर मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालये विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकतात तर आपण का नाही ?

मान.महोदय कोरोनाच्या काळात विद्यार्थी खुप त्रस्त होते अजूनही आहेत तरी आपण येणारी हिवाळी परीक्षा विद्यार्थ्यांना आँनलाइन व आँफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत हीच आमची माफक अपेक्षा अन्यथा आम्हाला लोकशाही अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या विद्यापीठात आंदोलन उभरावे लागेल याची नोंद घ्यावी अशे मेल मध्ये सांगण्यात आले.

Previous articleअखेर आरडव येथील वादग्रस्त स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित
Next articleघुग्घुस नगर परिषद कार्यालय स्थलांतरीत केल्यास तीव्र आंदोलन