Home Breaking News घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन साजरा.

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन साजरा.

462

 

बाबासाहेबांच्या संविधाना मुळेच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे पुस्तक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलीत करून व माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली व संविधानाचे वाचन करून शपथ घेण्यात आली तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विरांना श्रद्धांजली देण्यात आली.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले बाबासाहेबांच्या संविधाना मुळेच देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय सर्व नागरिकांना मिळाले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाला संविधान दिले. हे पवित्र संविधान देशाला अर्पण केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन देशात साजरा करण्यासाठी शासकीय आदेश काढला त्यामुळे शासकीय, निम शासकीय कार्यालयात व देशभरात संविधान दिन साजरा केला जातो संविधाना प्रमाणे सर्वांनी मार्गक्रमण करावे मि संविधानाला व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो.
भारतीय गणराज्याचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी बनून तयार झाले. भारताचे संविधान 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसात लिहून देशाला समर्पित करण्यात आले व 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात अंमलात आले.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे रामचंद्र चंदनखेडे, अनिरुद्ध आवळे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने, जेष्ठ नागरिक संघाचे मधुकर मालेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहने, वैशाली ढवस, अनंता बहादे, मल्लेश बल्ला, सुरेंद्र जोगी, भारत साळवे, शरद गेडाम, बबलू सातपुते, सुनील राम, तुलसीदास ढवस, सुनील बाम, पांडुरंग थेरे, विनोद जंजर्ला, विकास बारसागडे, वमशी महाकाली, दत्ता साळवे, किशोर बोन्डे, असगर खान, सचिन वैरागडे उपस्थित होते.

Previous article26/11 शहिदांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित
Next articleविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया घालवणाऱ्या शिक्षण संस्थेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मनसेने केली मागणी