Home Breaking News चिखली येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न…

चिखली येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न…

211

 

सतीश मुलंगे सह जगन मोरे लोणार

विधान परिषद निवडणुकीत विजय पताका फडकवणार; नेत्यांनी व्यक्त केला निर्धार.
मोताळा व संग्रामपूर नगरपंचायत महाविकास आघाडी आघाडीच्या नेतृत्वात लढणार.
आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्रित लढण्याच्या मुद्यावर चर्चा.
राज्यात मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने कोरोना महामारी सारखा प्रश्न मोठ्या संयमाने, धीराने सांभाळत नैसर्गिक संकटातही चांगली कामगिरी केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित लढविण्यासंदर्भात चर्चा करत अकोला, बुलढाणा व वाशीम या तीन जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून डिसेंबरमध्ये होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक ही एक हाती जिंकण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीची जिल्हा पातळीवरील संयुक्त बैठक आज २७ नोव्हेंबर रोजी चिखली येथे पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव,र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट गणेश पाटील, आमदार डॉक्टर संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेश एकडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, बळीराम मापारी यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होती.
या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित निवडणूक लढण्यास संदर्भात चर्चा करण्यात आली. सध्या अकोला,बुलढाणा, वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक लागली आहे. यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार हे आमदार गोपीकिशन बाजोरिया असून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील मोताळा व संग्रामपूर या दोन नगर पंचायतीच्या निवडणुका देखील घोषित झाल्या आहेत. या निवडणुका महा विकास आघाडीच्या नेतृत्वात एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापाठोपाठ आगामी सर्व नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या,कृ उ बा स च्या निवडणुका महाविकास आघाडीत लढण्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.
त्याचबरोबर तालुका व जिल्हास्तरीय समित्या वाटप करण्याच्या बाबतही चर्चा करत निर्णय घेण्यात आले.
४ डिसेंबरला बुलडाणा येथे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आघाडीच्या मतदारांचा मेळावा…
आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करत येत्या शनिवारी चार डिसेंबरला बुलढाणा येथे महाविकास आघाडीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधान परिषदेच्या जिल्ह्यातील मतदारांचा मेळावा दुपारी बारा वाजता आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.मेळाव्याचे स्थळ लवकरच निश्चित केले जाणार असून सर्व महा विकास आघाडीतील नेते आणि मतदारांची या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे.

Previous articleकारंजा तहसील कार्यालयात प्रहारचे ठिय्या आंदोलन विद्यार्थ्यांच्या अनेक समस्यांना घेऊन अक्षय भोणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे आंदोलन
Next articleरिक्षाचालकांचा अनोखा झोल, नऊ रिक्षांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट; चौकशीनंतर पोलिसही चक्रावले- मोहन चौकेकर